Pune Crime News : सात सराईतांकडून 17 पिस्टल व 13 काडतुसे जप्त, पुणे पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या हाती मोठा शस्त्रसाठा लागला (Pune Crime News) असून गुन्हे शाखेने सात सराईतांना 17 पिस्टल व 13 जिवंत काडतुसासह अटक केली आहे.

हनुमंत अशोक गोल्हार (वय 24, पाथर्डी, अहमदनगर), प्रदीप विष्णू गायकवाड (वय 25,. पाथर्डी, मूळ रा., बीड), अरविंद श्रीराम पोटफोडे (वय 38, रा. अमरापुरता शेवगाव, अहमदनगर), शुभम विश्वनाथ गरजे (वय 25, नेवासा,अहमदनगर), ऋषिकेश सुधाकर वाघ (वय 25,नेवासा), अमोल भाऊसाहेब शिंदे (वय 25, रा. नेवासा), साहिल तुळशीराम चांदेरे ऊर्फ आतंक (वय21, रा. सूसगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यात गोल्हार आणि गायकवाड हे डीलर आहेत.

Baramati News : अडीच लाखांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या कनीष्ठ अभियंत्याला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने 25 फेब्रुवारीला पिस्तूल विक्री करणाऱ्या दोन डिलर्सना वाघोली येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे मिळाली होती. तपासादरम्यान, आरोपी हनुमंत गोल्हार हा नवी मुंबई येथील 2 कोटी 80 लाख रुपयांच्या एका दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समजले. त्यानंतर आरोपींकडून पिस्तूल विकत घेणारे अरविंद पोटफोडे, शुभम गरजे, ऋषिकेश वाघ, अमोल शिंदे यांना पोलिसांनी अटक केली.

तसेच, युनिट एकच्या पथकाने अन्य एका कारवाईत सिंचन भवनसमोरून साहिल (Pune Crime News) चांदेरे याला ताब्यात घेतले. या सर्व सात आरोपींकडून 17 गावठी पिस्तूल, 13 जिवंत काडतुसे, एक कार, मोबाईल असा सुमारे 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार, नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.