Pune Crime News : टोळीयुद्धातील ‘त्या’ खून प्रकरणात कुख्यात गुंड गजा मारणेसह 20 जणांची निर्दोष मुक्तता

एमपीसीन्यूज : पुण्यातील वैकुंठभूमी स्मशानभूमी परिसरात 21 नोव्हेंबर 2014 रोजी निलेश घायवळ टोळीतील गुंड अमोल बधे (वय 40) याचा दिवसाढवळ्या कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी गज्या मारणे टोळीतील 22 जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या सर्वांची आता या खून प्रकरण असून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

गजानन पंढरीनाथ मारणे (वय 49), रुपेश मारणे (वय 31), आकाश अवचर (वय 21), अक्षय वेडे (वय 21), प्रतीक जाधव (वय 23), अक्षय जोरी (वय 21), स्वप्नील मापारे (वय 23), ओंकार जाधव (वय 21), मंदार उर्फ विकी बांदल (वय 26), बालाजी कदम (वय 22), सागर डिंबळे (वय 24), तुषार बधे (वय 32), विशाल धुमाळ (वय 28), योगेश मोहिते (वय 27) बाळकृष्ण उर्फ पंड्या मोहिते (वय 30) सोमप्रशांत पाटील (वय 42), सागर राजपुत, राकेश गायकवाड उर्फ बाब्या गुरुजी, तानाजी कदम, विक्रम समुद्रे, विशाल उर्फ गोट्या डिंबळे (वय 25), राहुल उर्फ बंटी कळवणकर (वय 21), निखिल दुगाई, पप्पू उर्फ अतुल कुडले, सचिन ताकवले अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी संतोष नागु कांबळे (वय 27) यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली होती.

फिर्यादी आणि मयत हे जामिनावर होते. गज्या मारणे टोळीतील सचिन कुडले खून प्रकरणात ते तुरुंगात होते. 21 नोव्हेंबर 2014 रोजी ते मित्राच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी ते दुचाकीने वैकुंठ स्मशानभूमीत आले होते. अंत्यसंस्कार करून परत जात असताना गज्या मारणे टोळीच्या गुंडांनी भर रस्त्यात अडवून अमोल बधे याचा खून केला होता.

विशेष मोक्का न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी याप्रकरणी कामकाज पाहिले. पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.