Pune Crime News : धनकवडीत एका कार्यालयातून 26 तलवारी जप्त, एकाला अटक

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील धनकवडी परिसरातील एका तरुणाच्या कार्यालयातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या तरुणाने त्याच्या कार्यालयात लोखंडी पाट्यापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या तबल 26 तलवारी ठेवल्या होत्या. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे.

प्रतीक ज्ञानेश्वर भोसले (वय 33, रा. पार्श्वनाथनगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील गुन्हेगारावर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत होते. यादरम्यान दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी शिवतरे व ताजणे यांना प्रतीक भोसले याने त्याचे ऑफिस असलेल्या इमारती टेरेसवर तलवारी ठेवल्या असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पथकाने धनकवडी येथील ऑफिसच्या इमारतीत छापा टाकल्या असता त्यांना पांढऱ्या रंगाच्या पोत्यात तलवारी लपवून ठेवल्याचे आढळले. प्रतीक भोसले याचे धनकवडी येथे फायनान्सचे ऑफिस आहे. त्याठिकाणी या तलवारी होत्या.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, सहाय्यक उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहाय्यक निरीक्षक जुबेर मुजावर, शाहिद शेख, निलेश शिवतरे, अतुल मेंगे, धनंजय ताजणे, गणेश पाटोळे, सुमित ताकपेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.