Pune Crime News : नामांकीत कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने 26 वर्षीय महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -एका नामांकीत कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना पुण्यातील कोंढवा (Pune Crime News) परिसरात घडली. बलात्कार करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडित महिलेकडून  1 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी देखील करण्यात आली.
या प्रकरणी 26 वर्षीय पीडित महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरिफ खान, रवी आणि रियाज अशा 3 जणांविरोधात पोलिसांनी बलात्कार, खंडणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ खान याने पीडित महिलेला तो तिच्या पतीचा मित्र आहे असे सांगून ,एका नामांकीत ऑनलाईन डिलिव्हरी कंपनीमध्ये नोकरी लावून देतो ,असे सांगितले. डिलिव्हरी गर्ल म्हणून काम लावून देतो असे सांगत आरिफ ने पीडित महिलेला एक डिलिव्हरी करायची आहे यासाठी बोलावले. त्यानंतर त्याने त्या महिलेला एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरोधात शरीर संबंध ठेवले. या सगळ्याबाबत (Pune Crime News) कोणाला काही सांगितले तर फोटो व्हायरल करेन, अशी धमकी यातील दुसरा आरोपी रवी ने त्या महिलेला दिली आणि तिच्याकडून 1 लाख रुपयाची खंडणी  मागितली. तसेच यातील तिसऱ्या आरोपीने महिलेला वारंवार धमकावले. या सगळ्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
हा सगळा प्रकार जुलै 2022 ते ऑगस्ट 2022 दरम्यान घडला.
कोंढवा पोलिस ठाण्यात या 3 जणांविरोधात भारतीय दंडात्मक कलम 376 (2), 506, 384, 323 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.