Pune Crime News : 28 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, व्हिडीओ रेकॉर्ड करून सांगितले कारण…

एमपीसी न्यूज – पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 28 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरूणाने मोबाईलवर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला असून त्यामध्ये त्याने आत्महत्येचे कारण सांगितले आहे. या घटनेने संपूर्ण लोणी काळभोर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

रोहित सुनील पवार (वय 28) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात रोहितची पत्नी रेश्मा व तिच्या आईवर गुन्हा नोंद केला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की काही वर्षांपूर्वी रोहित आणि रेश्मा यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर पत्नी रेश्मा वेगळं राहण्यासंबंधी पतीसोबत वाद घालत होती. तर रोहितचा वेगळे राहण्यासाठी विरोध होता. याच कारणावरून पत्नी आणि सासू रोहितला त्रास द्यायचे आणि शिवीगाळ देखील करायचा.

याच त्रासातून रोहितने टोकाचे पाऊल उचलले. रोहितने मोबाईलवर पत्नी आणि सासूकडून कशा प्रकारे त्रास दिला जातो याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. आणि या दोघींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.