Pune Crime News : बकऱ्या चोरण्यासाठी चोरली 36 वाहने, अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला

28 लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसीन्यूज : बकऱ्या सोडवण्यासाठी पाच जणांच्या टोळक्याने तब्बल 36 वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. खडकी पोलिसांनी या टोळीच्या प्रमुखाला अटक केली असून 36 वाहनचोरीचे आणि चार बकरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ॲलेक्स लवरेंस ग्राम्स (वय 22) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून तब्बल 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ॲलेक्सच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

या टोळीने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात होऊन शेळ्या बकऱ्या सोडण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. या टोळीने पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यासह राज्यातील इतर भागातून ही वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

खडकी पोलिसांनी या टोळीच्या प्रमुखाला अटक केली असून 36 वाहनचोरीचे आणि चार बकरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या या टोळीला खडकी पोलिसांनी 29 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. त्यातील एक आरोपी अलेक्स हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. 16 डिसेंबरला पोलिसांनी त्याला अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत हा सर्व प्रकार उघडकीस आला.

ॲलेक्स हा पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात बीसीएच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. 2018 पासून त्याने चोरी करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 50 हून अधिक चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.