Mulshi Crime News :मुळशीत आढळलेला ‘तो’ मृतदेह शिवसेनेच्या माजी शाखाप्रमुखाचा; खून झाल्याची शक्यता

एमपीसी न्यूज – मुळशी खुर्द (ता. मुळशी) येथे हॉटेल दिशाजच्या जवळ  चिंचवडमधील शिवसेनेच्या माजी शाखाप्रमुखाचा मृतदेह गावकऱ्यांना सकाळी आढळून आला. त्यांचा खून झाल्याची शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने तपास सुरु केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विजय सर्जेराव सुर्वे (वय 40) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी मुळशी येथील गावकऱ्यांनी पौड पोलिसांना घटनेची माहिती कळवली. सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांनी प्रथम दारू पिऊन कोणी पडले असेल म्हणून दुर्लक्ष केले. मात्र, मृत व्यक्ती व्यक्ती पालथी पडलेली होती व अंगातून रक्तस्त्राव होत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने या घटनेची माहिती पौड पोलिसांना देण्यात आली.

पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, भालचंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, मृगदीप गायकवाड, पोलीस हवालदार शंकर नवले, बीट अंमलदार सचिन शिंदे, पोलीस नाईक चंद्रशेखर हगवणे, पोलीस पाटील आकाश कांबळे या पोलीस पथकाने घटनास्थळावर धाव घेतली.

मृतदेहाची आणि परिसराची पाहणी केली असता या मृत व्यक्तीचे नाव विजय सर्जेराव सुर्वे असल्याचे निष्पन्न झाले. सुर्वे हे चिंचवड येथील मोहननगरचे माजी शाखाप्रमुख होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.