Pune : रात्री घरात घुसून महिलेस व मुलास धमकी

एमपीसी न्यूज – घरात घुसून महिलेस व मुलास धमकी दिल्याची घटना रविवारी (दि.4) रात्री साडेदहा च्या सुमारास ताडीवाला रोड येथील भाजी मार्केट पुना जनरल स्टोअर्स येथे घडली.

याप्रकरणी एका 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी महिलेचे पती सागर उर्फ यत्या यांच्या पतीला मारहाण करण्यासाठी आठ ते नऊ जण त्यांच्या घरात घुसले. आणि त्यांच्या मुलाच्या गळ्यास धारदार हत्यार लावून महिलेस तुझ्या नव-याला परत ताडीवाल्यात दिसायचे नाही म्हणून शिवीगाळ करून धमकी दिली.व परिसरातील लोकांच्या  घरावर कोयते आणि लाकडी बांबू मारून दहशत निर्माण केली. फिर्यादी महिलेच्या पतीचे आणि यातील दहशत निर्माण करणा-यांमध्ये पूर्ववैमन्यस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.