Pune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 84 बेघर व्यक्ती निवारागृहात दाखल

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस उपायुक्तांनी बेघर व्यक्तीवर योग्य कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार खडक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सुभाषनगर, जेधे कॉलेज समोर, महाराणा प्रताप उदयान परिसर याठिकाणी शोध घेऊन 84 बेघर लोकांना निवारागृहात दाखल केले आहे.

खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी अधिकारी व कर्मचारी यांची दोन पथक तयार केली.

बेघर लोकांचा खडक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सुभाषनगर, जेधे कॉलेज समोर. महाराणा प्रताप उदयान परिसर याठिकाणी शोध घेवुन एकुण 84 बेघर इसमांना ताब्यात घेतले.

कोवीड-19 विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी त्यांना पुणे युथ फौंडेशन सेनादत्त पेठ निवारागृहात 42, जान्वी फाँडेशन पुणे रेल्वे स्टेशन निवारा गृहात 22 व जॉन पॉल स्लम डेव्हल्पमेंट प्रोजेक्ट या निवारागृहात 20 बेघर नागरिकांना दाखल करण्यात आले.

यापुढे ही खडक पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कोवीड -19 च्या अनुषंगाने व सुरक्षेच्या दृष्टीने बेघर लोकांचा शोध घेऊन कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.