Pune Crime News : जाहिरातीचे फलक लावण्यासाठी लाच मागणार्‍या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जाहिरातीचे फलक लावण्यासाठी तब्बल 3 लाख 60 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कर्मचारी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत आहे. लाचलुचपत विभागाने हा गुन्हा दाखल केला आहे.

बसवराज चित्ते असे गुन्हा दाखल झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, चित्ते हे येरवडा वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. एका व्यक्तीला जाहिरातीचा फलक लावण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी चित्ते यांनी त्या व्यक्तीकडे तीन लाख 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.

या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर चित्ते यांनी लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर लाचलुचपत विभागाच्या वतीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.