Pune Crime News : दारूविक्रीचे पैसे न देता मालकाला 12 लाखांचा गंडा; तिघांना अटक

एमपीसीन्यूज : वाईन दुकानामध्ये कामाला असलेल्या तिघांनी ग्राहकांना विक्री केलेल्या दारूचे पैसे मालकाच्या खात्यावर जमा न करता 12 लाख 29 हजारांचा अपहार केला. याप्रकरणी तिघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली.

जगदीश उत्तमराव गडघे (वय33, रा. वडगाव शेरी), धमेंद्र महेश रायकवार (वय 26, रा. लोहगाव) आणि गौतम सुभेदार कनोजिया (वय 23, रा. लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी अशोक मुलचंदानी (वय 56, रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूलचंदानी यांचे विमाननगरमध्ये के. एम. वाईन्सचे दुकान आहे. दुकानामध्ये जगदीश, धर्मेद्र आणि गौतम कामाला आहेत. त्यांनी दुकानातून जानेवारी 2019 ते जुलै 2020 कालावधीतील विक्री केलेल्या दारूचे 12 लाख 29  हजार रूपये मालकाच्या बँकखात्यावर ऑनलाईन वर्ग न करता अपहार केला.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. लहाने तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.