Pune Crime News : गोव्याच्या दारूला ब्रँडेड लेबल लावून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज – गोव्यातून बेकायदेशीररित्या मद्य आणल्यानंतर त्याच मद्याच्या बॉटलवर ब्रँडेड मद्याचे लेबल लावून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी या टोळीच्या ताब्यातून 2 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

प्रणव संजय पळीवाले (वय 25, रा. शुक्रवार पेठ), श्रीनिवास विठ्ठल वाघमारे (वय 35, रा. सोलापूर), रविंद्र दत्तात्रय कासेगावकर (वय 55, रा. वडगाव बुद्रुक) व सुनिल रामचंद्र कांबळे (वय 28) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, खडक पोलिसांचा तपास पथकातील काही कर्मचारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असते त्यांना त्यांना आरोपी प्रणव याने सोसायटीच्या बंद खोलीत महाराष्ट्रात बंदी असलेली दारू गोव्यातून आणून विक्री करण्यास ठेवली असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार, सहाय्यक निरीक्षक यशपाल सुर्यवंशी व पथकाने याची खातरजमा केली. त्यानुसार, याठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यावेळी पोलिसांना येथे गोव्यात विक्रीस परवानगी असलेली व महाराष्ट्रात बंदी असलेला दारूसाठा मिळून आला. पोलिसांनी येथून 2 लाख रुपयांची दारू जप्त केली.  प्रणव याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याला ही दारू त्याला श्रीनिवास, रविंद्र व सुनिल कांबळे हे आणून देत असल्याचे सांगितले. त्यानुसार या तिघांना देखील अटक करण्यात आली.

दरम्यान, बनावट लेबल सिल बनविणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. गोव्यात दारू स्वस्त आहे. ब्लेंडर प्राईड ही महाराष्ट्रात 180 ला असेल तर ती गोव्यात केवळ 85 रुपयांना मिळते. त्यामुळे आरोपी तेथून स्वस्तात दारू आणून येथे विक्री करत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.