Pune Crime News : फेसबुक फ्रेंडकडून लग्नाच्या आमिषाने तरूणीवर दोन वर्षे बलात्कार

एमपीसी न्यूज –  फेसबुक फ्रेंडने एका 24 वर्षीय तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर सलग दोन वर्षे बलात्कार केला. दोन वर्षांनी मात्र, लग्न करण्यास नकार दिला. या सर्व प्रकारानंतर पीडित तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. 37 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 

रोहित रोहिदास भुजबळ (वय 37, गणेश कॉलनी, काळे पडळ, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 24 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फेब्रुवारी 2019 मध्ये आरोपी आणि फिर्यादी यांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरोपीने आधी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि पीडित तरुणीची ओळख केली.

त्यानंतर तिला प्रपोज करून 2019 ते 2021 या दोन वर्षांच्या कालावधित तिला लोणावळा, कळंबोली, मुंबई, कात्रज, वडगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजवर घेऊन जात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर फिर्यादीसोबत लग्न करण्यास नकार दिला.

पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.