Pune Crime News : भाजी घेऊन परतणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – भाजी खरेदी करून मैत्रिणीसोबत पायी रस्त्याने घरी परतत असताना एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 39 हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्याने चोरून नेली. ही घटना काल संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास वारजेतील स्पंदन इमारतीसमोर घडली.

याप्रकरणी केतकी चौधरी (वय 62) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

केतकी काल रात्री सातच्या सुमारास भाजी खरेदी करून मैत्रिणीसोबत रस्त्याने पायी घरी चालल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने केतकीच्या गळ्यातील 39 हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.