Pune Crime News : लॉकडाऊनमुळे दुकान उघडण्यास नकार देणाऱ्या बेकरी चालकाला टोळक्याची मारहाण

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन असल्यामुळे बेकी उघडण्यास नकार दिल्यामुळे तीन जणांच्या टोळक्याने बेकरी चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेकडी परिसरात हा प्रकार घडला.

याप्रकरणी इलियास मुमताज अन्सारी (वय 40) तक्रार दिली असून आरोपी शुभम उर्फ छम्या कांबळे, अजय उकिरडे आणि प्रेम थोरात या तिघांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इलियास अन्सारी यांची रामटेकडी येथे खुर्शीद बेकरी आहे. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तीनही आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी फिर्यादीला जबरदस्तीने दुकान उघडण्यास सांगितले. यावेळी फिर्यादी यांनी लॉकडाऊन असल्यामुळे दुकान उघडणार नसल्याचे सांगितले. यावेळी आरोपीनी कमरेला पाठीमागे लावलेला कोयता काढून “आम्ही कोण आहे, तुला माहित नाही काय, दुकान उघड नाहीतर खल्लास करून टाकेन” अशी धमकी दिली.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.