Pune Crime News : गावी जाण्यासाठी गाडीची वाट पाहणाऱ्याला लुबाडले

एमपीसी न्यूज – मध्यरात्रीच्या सुमारास पुणे बंगलोर महामार्गावर गावी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत थांबलेल्या एका तरुणाला दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी लुबाडण्याचे घटना उघडकीस आली आहे.. मंगळवारी मध्यरात्री नवले पुलाजवळ हा प्रकार घडला.

याप्रकरणी रोहन दिलीप पाटील (वय 23, रा. धायरी) यांनी फिर्याद दिली असून तेजस अर्जुन गायकवाड (वय 17, रा. जुनी सांगवी), सागर शशिकांत शिरवाळे (वय २२, रा. पिंपळेगुरव) आणि प्रेमराज प्रकाश मोरे (वय १८, रा. सांगवी) या तिघांवर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे पुणे-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ गावी जाण्यासाठी मंगळवारी रात्रीच्या सुमारास थांबले होते. यावेळी त्यांच्याजवळ दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या गळ्यातील 11 ग्रॅम सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली होती. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.