Pune Crime News : चोरी करण्याच्या उद्देशाने सोसायटीत शिरलेल्या चोरट्याच्या चाकूहल्ल्यात एक जण गंभीर जखमी

0

एमपीसी न्यूज – चोरी करण्याच्या उद्देशाने एका सोसायटीत शिरलेल्या चोरट्यांनी सकाळी व्यक्तींवर केलेल्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. नऱ्हे परिसरातील संकल्प सोसायटीत ही घटना घडली.

प्रमोद किसन घारे (वय 35) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्रमोद खरे यांच्या पद्धतीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सोमवारी पहाटेच्या सुमारास पार्किंग मधून आवाज येत असल्याने प्रमोद घारे यांनी गॅलरीतून खाली वाकून पाहिले. यावेळी त्यांना त्यांच्या गाडीजवळ एक व्यक्ती संशयास्पदरित्या दिसली. त्यानंतर तातडीने ते खाली उतरून गाडी जवळ गेले असता ती व्यक्ती गाडीचे लॉक तोडण्याचा प्रयत्न करत होती. प्रमोद यांनी त्याला विरोध केला असता दोघांमध्ये झटापट झाली. त्यानंतर काही अंतरावर उभे असलेले इतर तीन साथीदारही त्याठिकाणी आले आणि त्यांनी प्रमोद घारे यांना मारहाण केली. त्यातील एकाने चाकू काढून प्रमोद घाडगे यांच्या पोटात दोन वेळा खुपसला आणि कंपाऊंड वरून उडी मारुन पळुन गेले.

यात गंभीर जखमी झालेले प्रमोद खारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पहाटे साडेतीन ते सहा या वेळेत ते पार्किंग मध्ये पडून होते. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना पाहिले त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.