Pune Crime News : दहशत माजविण्यासाठी सोमवार पेठेत टोळक्याचा राडा

दोघांवर कोयत्याने वार, दोघांना अटक

एमपीसीन्यूज : दहशत परसरविण्यासाठी हातात कोयते घेउन दोघांवर वार करून दहशत माजविणाऱ्या दोघांना समर्थ पोलिसांनी अटक केली. त्यांचे चार साथीदार फरार झाले आहेत. ही घटना काल सोमवार पेठेतील सदानंदनगरमध्ये घडली.

चेतन संजय चव्हाण (वय २१, रा. मंगळवार पेठ) आणि संकेत अनंत तारू (वय २१, रा. कसबा पेठ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रहीम कुरेशी (वय २३, रा. मंगळवार पेठ ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काल संध्याकाळच्या सुमारास स्वयंघोषित भाई चेतन आणि इतर साथीदारांनी हातात कोयते घेउन सोमवार पेठेत गेले. त्यावेळी रहिमी त्यांचे मित्र रफिक शेख, अल्ताफ इनामदार, उमर शेख, बुरहान शेख गप्पा मारत बसले होते.

_MPC_DIR_MPU_II

टोळक्यातील चेतनने रहीमला ‘मी इथला भाई असताना सुद्धा तू मला नेहमी खुन्नस देतो’, असे म्हणत रहीमवर कोयत्याने वार केला.

भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या रफिक आणि अल्ताफ यांनाही आरोपींनी मारहाण केली . त्यानंतर परिसरात जोरजोरात आरडा-ओरडा करून हवेत कोयते फिरवत दहशत माजविली. त्यामुळे पसिरातील नागरिक सैरावैरा पळत होते. त्याशिवाय दुकानादारांनी दुकाने बंद केली.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.