Pune Crime News : प्रियकराच्या मदतीने पतीला नपुसंक बनवायचा आखला प्लॅन, मात्र… 

एमपीसीन्यूज : पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला नपुसंक बनवायचा प्लॅन आखला होता. मात्र, या प्लॅनचा सुगावा लागताच पतीने पोलिसात धाव घेतली. ही घटना पुण्यातील वारजे माळवाडी येथे घडली. विशेष म्हणजे दोघेही आरोपी मेकॅनिकल इंजिनिअर आहेत.

याप्रकरणी चेतन सुभाष सुरळे (27,रा.अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनूसार पत्नी स्मितल(25) व कौस्तुभ अनिल गोगाटे(22,रा.मुळ मालवण, सिंधुदुर्ग) यांच्यावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार चेतन व स्मितल यांचा विवाह मार्च महिण्यात झाला. चेतन हा सॉफ्टवेअर इंजिनिअर तर स्मितल ही मेकॅनिकल इंजिनिअर आहे. स्मितलचे विवाहापूर्वीपासून कौस्तुभ बरोबर प्रेमसंबंध होते. विवाहानंतर त्यांनी एकमेकांना भेटायचे नाही असे ठरवले होते. मात्र, ते दोघेही एकाच कंपनीत असल्याने त्यांचे प्रेमसंबंध पुन्हा जुळले.

कौस्तुभ हा नेमही चेतन यांच्या रहात्या घराबाहेर फेऱ्या मारताना चेतनला दिसत होता. पत्नी स्मितलने महाबळेश्‍वरला जायचे नियोजन केल्यावर दोघेही महाबळेश्‍वरला गेले होते. तेथेही कोस्तूभ हा चेतनला त्यांच्या अवती भोवती फिरताना दिसत होता. यामुळे चेतनला त्याच्या बद्दल संशय निर्माण झाला होता.

यामुळे त्याने पत्नीच्या मोबाईलची पडताळणी केली तर त्याला चेतन आणि तीच्यामध्ये झालेले चॅट सापडले. यामध्ये त्यांची चेतनच्या खासगी भागाची नस कापून त्याला नपुसंगक बनवण्याचा प्लॅनची चर्चा आढळली. या प्लॅनची ते महाबळेश्‍वरमध्येच अंमलबजावणी करणार होते. या प्लॅनचा सुगावा लागल्याने चेतनने तेथून काढता पाय घेत थेट पोलिस स्टेशन गाठले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III