Pune Crime News : भरघोस कमिशनचं आमिष दाखवून पुण्यातील महिलेची 19 लाखांना फसवणूक

एमपीसी न्यूज- पार्ट टाईम जॉब आणि त्यातून मिळणारे कमिशनच्या नादात पुण्यातील महिलेने 19 लाख 55 हजार रुपये (Pune Crime News ) गमावले .पार्ट टाईम जॉब मधून दिवसाला अडीच ते तीन हजार रुपये कमविण्याचे आमिष दाखवून तिघांनी मिळून  महिलेची फसवणूक केली.

पुण्यातील मार्केटयार्ड मध्ये राहणाऱ्या 37 वर्षीय महिलेने या प्रकरणी  मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे

या प्रकरणी दोन नामांकीत कंपनींच्या मालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri News : आपला सातबारा देशातील 22 क्षेत्रीय भाषांमध्ये

मिळालेल्या माहितीनुसार, यातील एका आरोपीने फिर्यादी महिलेला त्यांच्या मोबाईलवर पार्टटाईम जॉब करून दिवसाला 2500 ते 3000 रुपये कमावण्याचे आमिष दाखवले. नोकरीची गरज असल्यामुळे या अमिषाला ती महिला बळी पडली.

आरोपीने त्यानंतर महिलेला वाॅट्सपवर माहिती पाठवून एका वेबसाईटवर जाऊन सर्व माहिती भरायला सांगितली. आरोपींनी काम सुरू झाल्याचे सांगत फिर्यादी यांना टुर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स्चे रेटिंग आणि रिव्ह्यू करण्याचे काम दिले. आरोपींच्या सांगण्यानुसार फिर्यादी यांनी ते काम पूर्ण केले .

दरम्यान, आरोपी याने फिर्यादी यांना त्याच्या यूपीआय आयडीवर 5000 हजार भरायला (Pune Crime News ) सांगितले. फिर्यादींना कामामध्ये मोठी रक्कम मोबदला म्हणून मिळते आहे, असे सांगत अनेक वेळा पैसे उकळले. आरोपींनी त्या महिलेकडून 19,55 ,171 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. एवढी मोठी रक्कम गेल्यामुळे महिलेने पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात भारतीय दंडात्मक पोलिस ठाण्यात 499,420 तसेच आय टी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.