Pune Crime News : चहा सांडल्याच्या वादातून तरुणावर धारधार शस्त्राने वार

एमपीसी न्यूज-अंगावर चहा सांडल्याचा राग मनात धरून दोघांनी मिळून (Pune Crime News)  तरुणावर वार करण्याचा प्रकार घडला . पुण्यातील बिबवेवाडीमध्ये  18मार्च रोजी  ही घटना घडली.या प्रकरणी उदय साळवे (वय 19) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
 राहुल राठोड व अंकुर जाधव ही आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र संतोष जाधव हे दोघे ही 18 तारखेला रात्री बिबवेवाडी परिसरात असलेल्या एका चहाच्या दुकानात चहा पिण्यासाठी गेले होते. त्याच वेळी आरोपी राहुल राठोड आणि अंकुर जाधव हे देखील त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले होते. आरोपी आणि फिर्यादी हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. दरम्यान, तक्रारीनुसार, संतोषचा आणि आरोपींचा चहा सांडण्यावरून त्या ठिकाणी वाद झाला.

 

Pimpri News : सामाजिक बांधिलकीचे 75 विविध समाज उपयोगी उपक्रम

या गोष्टीचा राग मनात ठेऊन त्या दोन्ही आरोपींनी दुसऱ्या दिवशी फिर्यादी याच्यावर हल्ला करायचे ठरविले. बिबवेवाडीमध्ये असलेल्या साईनगर भागातून फिर्यादी उदय जात असताना त्या दोघांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या कमरेवर हाताने आणि धारधार शस्त्राने वार केला. यात उदय जखमी झाला.या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक (Pune Crime News) केली आहे.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.