Pune Crime News : जवानाकडून लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – भारतीय सैन्यदलात काम करणाऱ्या एका जवानाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. 9 एप्रिल 2020 पासून वेळोवेळी हा प्रकार घडला. 21 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित जवानावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रसाद अनिल ननावर (वय 26) असे या जवानाचे नाव आहे. सध्या तो राजस्थानमध्ये पोस्टिंगवर आहे. हा प्रकार घडला तेव्हा तो पुण्यातील सदर्न कमांडमध्ये पोस्टिंगला होता. यावेळी त्याची संबंधित तरुणीशी ओळख झाली होती. यावेळी त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच फिर्यादीच्या आई-वडिलांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. हे पैसे मिळाल्यानंतर त्याने पीडित तरुणीसोबत लग्न करण्यासाठी नकार दिला आहे.

संबंधित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.