Pune Crime News : अपहरणाच्या गुन्ह्यात 20 वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराला अटक

Pune Crime News: Abducted for 20 years in kidnapping case Criminal arrested

एमपीसी न्यूज – अपहरणाच्या गुन्ह्यात तब्बल 20 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केले. मैनुद्दित साहब पटेल (रा.भिमनगर झोपडपट्टी कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

अपहरणाच्या गुन्ह्यातील 20 वर्षांपासूनचा फरार आरोपी पेट्रोलपंपाजवळ येणार असल्याची माहिती कर्मचारी गोसावी यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून मैनुद्दितला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ही कामगिरी वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे, गुरव, भंडलकर, गिरमकर, गोसावी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.