Pune Crime News : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग, आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग करून तिला लग्नासाठी मागणी घालून तिला त्रास देणार्‍या तरुणाला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली.

कुतुबुद्दीन हबीब काचवाला (वय 23) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात 21 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. ही घटना 2016 ते मे 2021 या कालावधीत घडली.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी आणि आरोपी 2016साली एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. यावेळी आरोपीने तिचा सतत पाठलाग केला. तेव्हाच पीडित मुलीने आपण संबंध ठेवू शकत नाही असे त्याला सांगितले होते. तरीही त्याने पाठलाग सुरूच ठेवला होता.

आरोपीने या तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. भविष्यात तुला माझ्यासोबतच लग्न करावे लागेल. दुसऱ्या सोबत लग्न केल्यास तुझ्या आई वडिलांना जीवे मारेल अशी धमकीही त्याने या तरुणीला दिली. तसेच त्यांनी या तरुणी कडून वेळोवेळी चाळीस हजार रुपये आणि एक तोळ्याचे सोन्याचे दागिने घेतले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असेल सपना आता केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.