Pune crime News : पर्वती टेकडीवर मित्राकडून तरुणीवर बलात्कार, आरोपी अटकेत

एमपीसीन्यूज : भेटण्यासाठी बोलावून घेत एका तरुणाने तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पर्वती टेकडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

योगेश मोहन मंद्रे (वय २२, रा. निखील पार्क, माणिकबाग) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्ररादार तरुणी मॉलमध्ये आणि योगेश एका कंपनीत काम करतो. मॉल व कंपनी हे शेजारी असल्यामुळे त्यांची ओळख झाली होती. त्यातून त्यांची मैत्री झाली होती. त्यानंतर योगेशने २४ नोव्हेंबरला रात्री तरुणीला पर्वती टेकडीवर भेटण्यासाठी बोलविले होते.

त्यानुसार तरुणी त्याला भेटण्यासाठी गेली. त्यानंतर आरोपीने तिला पर्वती टेकडीच्या जंगलात घेऊन जात बलात्कार केला. घटनेनंतर तरुणी घरी गेली होती. त्यानंतरही योगेश तिला सतत त्रास देत असल्यामुळे तिने पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली.

याप्रकरणी दत्तवाडी पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.