Watch Aundh Murder CCTV Footage: पाहा औंधमधील खुनाचा थरार! खून प्रकरणातील आरोपी अटकेत, ‘या’ कारणामुळे केला खून!

एमपीसीन्यूज : चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील औंध परिसरात सोमवारी सायंकाळी पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. क्षितिज  वैरागर (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खून प्रकरणातील एका आरोपीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे.

तीन हजार रुपयावरून झालेल्या वादातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अनिकेत दीक्षित असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत आणि क्षितिज एकमेकांचे मित्र होते. काही महिन्यापूर्वी मोबाईल खरेदीच्या तीन हजार रुपयांवरून दोघांमध्ये भांडण झाले होते.

त्यावेळी क्षितीजने अनिकेतला जबर मारहाण केली होती. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

याच भांडणाचा राग मनात ठेवून अनिकेतने हा खून केला. सोमवारी सायंकाळी क्षितिज राहत असलेल्या वस्तीमध्ये थांबला होता. यावेळी हातामध्ये कुऱ्हाड घेऊन आलेल्या अनिकेतने त्याच्यावर सपासप वार केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या क्षितिजला स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात नेले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.