Pune Crime News : घरफोडीच्या गुन्ह्यांतील 28 वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज – कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यांतील 28 28 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने आज (शनिवार, दि.10) ही कामगिरी केली.

विष्णु सुंदरराव विटकर (वय 45, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटकर याने 1992 साली कोथरूड परिसरात घरफोडी केली होती तेव्हापासून तो फरार होता. गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना हा आरोपी हडपसर येथे आला असल्याची माहिती पथकाला मिळाली.

त्यानुसार सापळा रचून त्याला दुपारी तीनच्या दरम्यान ताब्यात घेतले. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कोथरुड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.