Pune Crime News : घरफोडी व जबरी चोऱ्या करणाऱ्या आरोपीला बेड्य़ा

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ व मार्केटयार्ड पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोऱ्या व घरफोडी करणाऱ्या अट्टल चोराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट दोन यांनी (Pune Crime News) अटक केली आहे. ज्यामध्ये त्याच्यावरील चार गुन्ह्यांची पोलीस तपासात उकल झाली आहे.

सचिन जाधव बोकेफोडे (वय 19 रा.कात्रज) असे अटक आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी त्याला कात्रज येथील मस्तान हॉटेल जवळून अटक केली आहे.

पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपास करत असताना गुन्हे शाखा दोनचे पोलीस अमंलदार उज्वल मोकाशी व संजय जाधव यांना बातमी मिळाली की,घरफोडीतील सराईत आरोपी हा कात्रज येथील एका हॉटेल जवळ थांबला आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याने चोरी केल्याचे कबुल केले. पोलीस तपासात त्याच्यावर दाखल असलेले भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील एक तर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन गुन्हे उघडकीस आले. पुढील तपासासाठी आरोपीला भारती विद्यापीठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले (Pune Crime News) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.