Pune Crime News : ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय तरुणीची हत्या करून आरोपी पोलिसांसमोर हजर

एमपीसी न्यूज – लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 16 वर्षीय तरुणी सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका तरुणाने तिचा खून केला आणि त्यानंतर तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. पेरणे फाटा परिसरात गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला. लोणीकंद पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

_MPC_DIR_MPU_II

सागर सारधर वानखेडे (वय 28, पेरणे फाटा, मूळ, बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. तर मृत तरुणीचे वय 16 वर्ष सहा महिने इतके आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपीने चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून खून केला असल्याची माहिती पुढे येत आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सागर वानखेडे हा पेरणे फाटा परिसरात एका अल्पवयीन तरुणीसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता. आरोपी बुलढाण्याचा रहिवाशी आहे. तो येथीलच एका तूप बनवणाऱ्या कंपनी काम करत होता. तर मृत तरुणी मुंबईची रहिवासी आहे. हे दोघे एकत्र कसे आले याची माहिती अद्याप मिळाली नाही. मात्र मागील काही दिवसापासून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती समोर येत आहे. लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.