Pune Crime News : खुनाच्या गुन्ह्यातील पाच वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज – खून करुन फरार झालेल्या आरोपीला पाच वर्षांनंतर जेरबंद करण्यात चंदननगर पोलिसांना यश आले आहे. या आरोपीला परभणी येथून शुक्रवारी (दि.26) ताब्यात घेतले.

सचिन उत्तम तावरे (वय 34, रा. काठेवाडी, बारामती, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे इतर दोन साथिदारांसोबत प्रकाश देवळे यांचा खून करून फरार झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन हा परभणी जिल्ह्यातील काळे धानोरा याठिकाणी असल्याची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली. चंदननगर पोलिसांनी टिम तयार करून सचिन तावरे याला ताब्यात घेतले. आरोपीला पकडण्यासाठी परभणी स्थानिक पोलिसांनी मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.