Pune Crime News : निलेश घायवळ टोळीतील आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील आरोपीला कोथरुड पोलिसांनी नुकतीच अटक केली.समीर बाळू खेंगरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तेजस्वी पवार व त्यांचा स्टाफ खासगी वाहनाने पेट्रोलींग करीत होता.त्यावेळी पोलिस अंमलदाराच्या मार्फत सदर गुन्हेगार कर्वे पुतऴा येथील शीतल हॅटेलसमोर येणार असल्याची माहिती मिऴाली. त्यानंतर वरिष्ठांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांच्या आदेशाप्रमाणे समीर खेंगरे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे नाव,पत्ता याची विचारणा पोलिसांनी केली.

समीर खेंगरे याने आपण संत ज्ञानेश्वर कॅलनी आशिष गार्डन येथे राहत असल्याचे सांगितले आणि गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याची कबुली दिली.समीर याला कोथरुड पोलिसांनी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.