Pune Crime News : कॉल सेंटरमधील तरुणीवर बलात्कार प्रकरणी ‘तो’ आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज – खराडी परिसरातील कॉल सेंटरमध्ये काम करणारी तरुणी काम आटोपल्यानंतर घरी परत जात असताना तिचे अपहरण करून बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी अखेर अटक केली. आरोपी हा चोवीस वर्षाचा असून खराडी परिसरात राहणारा आहे. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पीडित तरुणी खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ती दुचाकीवरून धानोरीला घरी चालली होती. त्यावेळी आरोपींनी तिचा पाठलाग करून टिंगरेनगर परिसरात अडविले. त्यानंतर तिला मारहाण करून त्याच्या दुचाकीवर बसविले. तरुणीला पुन्हा खराडी परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी नेउन बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तरुणीला गुंजन चौक परिसरात आणून सोडल्यानंतर तिने मित्राला घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती.

दरम्यान पीडित तरुणी ही आरोपीला ओळखत नव्हती. त्यामुळे आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यामुळे विश्रांतवाडी पोलिसांनी या संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून काढले. त्यातील एका सीसीटीव्ही मध्ये आरोपी पीडित तरुणीला घेऊन जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन शनिवारी पहाटे त्याला अटक केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.