Pune Crime News : सुरक्षारक्षकावर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज-हातगाडीवर विसरलेली वॉकीटॉकी घेण्यासाठी गेलेल्या (Pune Crime News) सुरक्षा रक्षकावर कोयत्याने वार करुन आणि समोरचे दात तोडून गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकाला जेरबंद केले. विमानतळ पोलिसांनी ही कारवाई केली असून, गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता. फिरोज मोहम्मद शेख (रा. लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. ही घटना 25 सप्टेंबर 2022 रोजी घडली होती. आनंद महेश नडगम यांनी तक्रार दिली होती. यातील तक्रारदार सुरक्षा रक्षक आहेत. त्यांच्याकडे असलेली वॉकीटॉकी हातगाडीवर विसरल्याने ते वॉकीटॉकी घेण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान फिरोज शेख व त्याच्या तीन साथीदारांनी जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिरोज याने त्यांना शिवीगाळ करुन खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी कोयत्याने वार केले होते.

या गुन्ह्यानंतर तो फरार झाला होता. शोध घेताना फिरोज हा त्याच्या घरी आल्याची (Pune Crime News) माहिती पोलीस अंमलदार नाना कर्चे व योगेश थोपटे यांना मिळाली होती. त्यानंतर तपास पथकाने त्याला सापळा रचून पकडले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.