Pune Crime News : येरवड्यातील सराईताविरोधात ‘एमपीडीए’नुसार स्थानबद्धतेची कारवाई

एमपीसीन्यूज : येरवडा परिसरात दहशत पसरविणा-या सराईताविरूद्ध एमपीडीए कायद्यानुसार वर्षभराची स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरूद्ध वर्षभरात 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी कृत्यांवर परिणाम झाला नव्हता. त्यामुळे सार्वजनिक सुव्यस्थेला बाधा निर्माण झाल्यामुळे त्याच्याविरूद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.

नीलेश उर्फ पिन्या संजय साळवे (वय २०, रा. यशवंतनगर, येरवडा) असे स्थानबद्ध केलेल्याचे नाव आहे.

नीलेश उर्फ पिन्या सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध येरवडा पोलीस ठाण्यातंर्गत दुखापत, गंभीर दुखापत, चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षभरात त्याने पाच गुन्हे केले होते. त्यानंतर त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.

मात्र, त्यानंतरही त्याच्या गुन्हेगारीमध्ये फरक पडला नाही. त्यामुळे येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी नीलेश उर्फ पिन्याविरूद्ध एमपीडीएनुसार पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला. त्यानुसार त्याला वर्षभरासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.