Pune Crime News : वडगाव शेरीत भेसळयुक्त तूप बनवणाऱ्या दोन कारखान्यांवर कारवाई; कॅनमध्ये आढळला उंदीर

सोहिल आणि दिनेश हे दोन्ही भाऊ मिळून वेगवेगळ्या ठिकाणी भेसळयुक्त तूप तयार करून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

एमपीसीन्यूज – पुणे शहर पोलीस दलातील खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने वडगाव शेरी परिसरात भेसळयुक्त तूप तयार करुन त्याची विक्री करणाऱ्या दोन कारखान्यांचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोघांना ताब्यात घेत इतर साधन सामग्री व कच्चामाल असा मिळून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  

सोहील मेहंदी भानोडिया व दिनेश मेहंदी भानोडिया ( दोघे रा. वडगाव शेरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सोहिल आणि दिनेश हे दोन्ही भाऊ मिळून वेगवेगळ्या ठिकाणी भेसळयुक्त तूप तयार करून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी अन्न व पुरवठा अधिकारी यांना संपर्क करून त्यांच्यासमवेत वडगाव शेरी येथील दोन गोदामांवर छापा मारला. या कारवाईत भेसळयुक्त 750  लिटर तूप इतर साधन सामग्री व कच्चामाल असा मिळून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी कॅनमध्ये जीवंत उंदीर देखील आढळून आला.

पुढील कारवाई अन्न व पुरवठा अधिकारी करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.