Pune Crime News : मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला आणखी एक आरोपी जाळ्यात

एमपीसी न्यूज – लोणी काळभोर पोलिसांनी मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या शुभम भाऊसो बरकडे (वय 23, रा. लोणी काळभोर) याला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हेगार शुभम कामठे याला अटक केली होती. यादरम्यान शुभम फरार झाला होता.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शुभम कामठे आणि त्याच्या टोळीने एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणावर वार केले होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे आरोपी पसार झाले होते. या गुन्ह्यात मोक्काची कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी शुभम कामठे याला पाठलाग करून पकडले होते. तर त्याच्यासोबत असलेला बरकडे हा पसार झाला होता. दरम्यान शुभम हा कोलपेवस्तीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याला सापळा रचून अटक केली आहे.

ही कारवाई परिमंडळ चारच्या उपायुक्त नम्रता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, कर्मचारी नितीन गायकवाड, अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, राजेश दराडे, दिंगबर साळुंखे, बाजीराव वीर, निखिल पवार, शैलेश कुदळे, रोहिदास पारखे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.