Pune Crime News : मार्केटयार्ड तोडफोड प्रकरणी आणखी एकाला अटक

एमपीसी न्यूज – पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकरनगरमध्ये बुधवारी रात्री तोडफोड करण्यात आली होती. त्यातील 4 आरोपींना मार्केटयार्ड पोलिसांनी बुधवारीच अटक केली होती. त्यातील आणखी एकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

तेजस रामलाल यादव (वय 20, रा. मीनाताई ठाकरे वसाहत) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पुढील कारवाईसाठी त्याला मार्केटयार्ड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर वसाहतीत काल रात्री हातात तलवारी अन कोयते व दांडूके घेऊन आलेल्या टोळक्याने चांगलाच धुडगूस घालत 40 ते 50 वाहनांची तोडफोड करत अंधाधुंद गोंधळ घातला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी काही वेळातच चौघांना अटक केली होती. तर इतरांचा शोध सुरू होता.

यादरम्यान स्वारगेट पोलीस गस्त घालत असताना पोलीस हवालदार सचिन कदम, ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी तेजस हा गुलटेकडी या भागात येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब कोपनर व त्यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून त्याला पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी मार्केटयार्ड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.