Pune Crime News : उद्योगी नाना गायकवाड विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा

एमपीसी न्यूज – खंडणी, फसवणूक आणि ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असणाऱ्या नाना गायकवाड आणि त्याच्या आणखी काही सहकाऱ्यांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चतु:शृंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. व्याजाच्या पैशातून मर्सिडीज कार घेऊन धमकावण्यास पिस्तूलातील तीन गोळ्या झाडल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. याबाबत 37 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

दरम्यान नानासाहेब, मुलगा गणेश, पत्नी यांच्यासह दुसरी मुलगी, जावई आणि आणखी एक असे मोक्काच्या गुन्ह्यात अटकेत आहेत. याप्रकरणी नानासाहेब शंकरराव गायकवाड, दीपा नानासाहेब गायकवाड, राजू दादा अंकुश व नानासाहेब यांचा ड्रायव्हर यांच्यावर चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपीकडून तक्रारदार व्यक्तीने 4 टक्के व्याजाने 29 लाख रुपये घेतले होते. या पैशाचे व्याज ते दर महिन्याला घरी जाऊन देत असत. परंतु तरीही मुद्दल न दिल्याचे कारण सांगून आरोपींनी फिर्यादीला घरी बोलावले. त्यांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. तर त्यांना बंगल्यावर बोलवून घेत त्यांच्या अंगावर कार घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पिस्तूलातुल तीन गोळ्या झाडल्या आहेत. तक्रारदार यांनी 32 लाख रुपये परत केल्यानंतर गाडी मागितली असता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.