Pune Crime News : बिबवेवाडीत खून झालेल्या ‘माधव वाघाटे’वर आणखी एक गुन्हा दाखल

एमपीसीन्यूज : बिबवेवाडीत खून झालेला सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री त्याने व्हाट्सअप स्टेटसच्या वादातून एका तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी सावन गवळी (वय 23, ओटा स्कीम) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार मयत माधव वाघाटे याच्यासह 10 ते 12 जणांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी सावन गवळी याने मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस व्हाट्सअप ठेवले होते. याच रागातून माधव वाघाटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री फिर्यादीला गाठले आणि “बघ आज तुझे तुकडे करायला माझी गॅंग आली आहे”, असे म्हणत त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला.

परंतु, फिर्यादीने हा वार चुकवल्याने यामध्ये त्यांच्या मानेला दुखापत झाली. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या इतर आरोपींनी सावन गवळी यांना बेदम मारहाण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.