Pune Crime News : आणखी एक लाचखोर अधिकारी जाळ्यात, 50 हजाराची लाच स्वीकारताना पकडले

एमपीसी न्यूज – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यातील आणखी एका अधिकाऱ्याला आणि एका खासगी व्यक्तीला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पुणे विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

रामदास वालझडे असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. त्याच्या कार्यालयाची झाडाझडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरटीई मार्फत प्रवेश प्रकरणात ही लाच मागण्यात आली होती. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार त्याची पडताळणी करण्यात आली. आज सापळा रचला. तसेच जिल्हा परिषदेच्या कार्यलयातच 50 हजार रुपयांची लाच घेताना दोघांना पकडण्यात आले आहे. ही कारवाई झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.