Pune Crime News : शहरात आणखी एक खून, दोन दिवसात खुनाच्या चार घटना

एमपीसी न्यूज – लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. फिरस्ती असणाऱ्या एका व्यक्तीच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घालून त्याचा खून करण्यात आला आहे. हा खून कोणी आणि कशासाठी केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले आहे.  पुणे शहरात मागील दोन दिवसात खुनाचे चार प्रकार घडले आहेत. खून झालेल्यांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

इस्माईल सय्यद (वय 55) असे खून झालेल्या व्यक नाव आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोदीखाना परिसरात मृत इस्माईल सय्यद हा झोपडीवजा घरात राहत होता. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तो घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक माहिती घेतली असता हा मृतदेह इस्माईल याचा असल्याचे निदर्शनास आले.

लष्कर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.