Pune crime News : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सशस्त्र टोळीला अटक

याप्रकरणी गुन्हे शाखा‌ युनिट-4 चे सहायक पोलीस फौजदार अब्दुल करीम सय्यद यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमपीसी न्यूज – हातात शस्त्र घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार ते पाच जणांच्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना रविवारी (दि.13) सायंकाळी सातच्या सुमारास संगमवाडीकडे जाणाऱ्या आद्यक्रांती लहुजी वस्ताद साळवे मार्गावर अटक करण्यात आली.‌

दिलीप विठ्ठल भोई (वय, 28 रा.पुणे रेल्वे स्टेशन फिरस्ता), विकास दिलीप कांबळे ( वय 25 रा.अपर इंदिरानगर ), राजा ऊर्फ विकास सिताराम लांडगे ( वय, 35 रा. पुणे रेल्वे स्टेशन फिरस्ता), रोहित शंकर पाटील (वय,22 रा. गांधीनगर वसाहत, पिंपळे गुरव यांना अटक केली आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखा‌ युनिट-4 चे सहायक पोलीस फौजदार अब्दुल करीम सय्यद यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीर व अनधिकृतपणे एक चाकू, दोन लोखंडी रॉड व नायलॉनची दोरी इत्यादी घातक शस्त्रे जवळ बाळगली.

तसेच हत्यार व साथीदारांची जमवाजमव करून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी गुन्हे शाखा‌ युनिट-4 च्या पोलिसांनी त्यांना अटक केली.

पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.