Pune Crime News : सीएकडून 30 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील सीए (चार्टड अकाऊंटट) ला कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत 30 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला पुणे पोलिसांनी (Pune Crime News) अटक केली आहे. सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने गुन्हे शाखा युनीट दोनच्या तपासी पथकाने अटक केली आहे.
किरण रामदास बिरादार (वय 24 रा.मांजरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध चार्टड अकाऊंटट यांनी पोलिसात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 5 जानेवारी रोजी व्हॉटसअप चॅटींग करून प्रथम दहा लाख रुपये मागितले. पैसे नाही दिले तर संपूर्ण कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. पैसे देण्यासाठी पी.एम.सी.बिल्डिंग मागे जागा ठरली. त्याला संशय आल्याने आरोपीने पुन्हा जागा बदलून गरवारे कॉलेज येथे ब्रीज जवळ पैसे घेऊन येण्यास सांगितले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून सापळा रचला.
बॅगेत खऱ्या व खोट्या अशा दोन्ही नोटांचे बंडल भरून ती बॅग ब्रीजखाली झुडूपात ठेवली. साध्या पोशाखात पोलीस लपून बसले होते. आरोपीने बॅग उचलली व मोबाईल तेथेच टाकून तो पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली.त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल व 10 हजार 600 रुपया जप्त केले. आरोपीवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास स्वारगेट पोलीस करत (Pune Crime News) आहेत.