Pune Crime News : स्वतः राहात असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – स्वतः राहात सोसायटीमध्ये राहण्यास आहे त्याच सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी करणाऱ्या एका चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याशिवाय शहराच्या विविध भागातही त्यांनी अशाच प्रकार चोऱ्या केल्या असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अक्षय दिपक पाठक (वय 26 रा. दत्तवाडी) असे चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की खंडणीविरोधी पथकाचे कर्मचारी पुणे शहर आणि परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना दत्तवाडी परिसरात एक व्यक्ती चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखवत असेल त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

आरोपी अक्षय पाठक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी केलेले पाच गुन्हे दाखल आहेत. शहरातील दररोज वाहनांची चोरी झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यांनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक निरीक्षक संदीप बुवा, कर्मचारी पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबसे, मधुकर तुपसौंदर, रविंद्र फुलपगारे, रमेश चौधर, नितीन कांबळे,गजानन सोनवलकर, दुर्योधन गुरव यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.