Pune Crime News : साफसफाई करण्याच्या बहाण्याने ‘FTII’मध्ये चोर्‍या करणाऱ्याला अटक

एमपीसीन्यूज : एफटीआयआयच्या पार्किंग मधील दुचाकी गाड्यांच्या बॅटरी सह इतर साहित्य चोरून नेणाऱ्या एकाला डेक्कन पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरलेल्या बॅटरी आणि टेम्पो असा 2 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

राहुल राम भांडवे (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफटीआयआयच्या आवारात विद्यार्थ्यांनी पार्क केलेल्या 10 दुचाकीच्या बॅटरी आणि इतर साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर संस्थेतील भगवान गणपती शेकापुरे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यांमध्ये चोरीची तक्रार दिली होती.

डेक्कन पोलिस या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे यांना एक व्यक्ती टेम्पोतून काही साहित्य घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डेक्कन पोलिसांनी म्हात्रे पुलाजवळ सापळा रचून राहुल वाढवे याला टेम्पोसह ताब्यात घेतले.

टेम्पोची तपासणी केली असता त्याने चोरलेल्या बॅटऱ्या आणि इतर साहित्य आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत एफटीआयआयमध्ये साफसफाई करण्याच्या बहाण्याने त्याने चोरी केल्याचे कबूल केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.