Pune crime News : फसवणुकीच्या गुन्ह्यात 22 वर्षापासून फरार आराेपी जेरबंद

एमपीसीन्यूज : बॅंकेत बनावट कागदपत्रे सादर करुन 13 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणाचे गुन्ह्यातील मागील 22 वर्षापासून फरार असलेल्या आराेपीस जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पथकास यश आले आहे.

संदीप सुधाकर धायगुडे (वय-53,रा. सदाशिव पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव असून ताे स्वत:चे अस्तित्व लपवून ठिकाणे बदलून राहत असल्याची माहिती पाेलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी दिली आहे.

आराेपी संदीप धायगुडे याने सन 1998 मध्ये त्याचे साथीदार आनंद प्रभाकर गाेरे (रा.नवी पेठ, पुणे, सध्या रा. अमेरिका), सुब्रताे दास (रा.मुंबई) यांच्यासह विद्या सहकारी बॅंक, सेनापती बापट रस्ता, पुणे येथे बनावट कागदपत्रे देऊन 13 लाख 55 हजार 936 रुपयांची फसवणूक केली हाेती.

याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर मागील 22 वर्षे ताे पाेलिसांना गुंगारा देऊन स्वत:चे अस्तित्व लपवून ठिकाणे बदलून राहत हाेता.

गुन्हे शाखा युनिट चारचे पाेलीस कर्मचारी सचिन ढवळे यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदर गुन्हयातील पाहिजे असलेला आराेपी संदीप धायगुडे याचा ठावठिकाणा काढला असता ताे काेथरुड परिसरात शिवतीर्थनगर येथे भाडयाचे खाेलीत राहत असल्याची बाब समाेर आली.

त्यानुसार पाेलीस उपनिरीक्षक शशिकांत शिंदे यांचे पथकाने सापळा रचून आराेपी संदीप धायगुडे यास अटक केली आहे. त्यास गुन्ह्याचे पुढील कार्यवाहीकरिता चतु:श्रुंगी पाेलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.