Pune crime News : दहशत निर्माण करण्यासाठी रिव्हॉल्व्हर बाळगणारा अटकेत

एमपीसी न्यूज – दहशत निर्माण करण्यासाठी रिव्हॉल्व्हर जवळ बाळगणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (दि.11) दत्तनगर चौक, सिध्दीविनायक मंदिर येथे हि कारवाई करण्यात आली.

अजिनाथ चंदु खंदारे ( वय. 23, रा. ओमपर सोसायटी, अभिनव कॉलेज जवळ, न-हे आंबेगाव, पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विना मास्क फिरणा-या नागरिंकावर कारवाई करण्यासाठी पोलीस पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी. आरोपी खंदारे एका पान शाॅप जवळ थांबला असून त्याच्या जवळ रिव्हॉल्व्हर असल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून खंदारे याला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्टल व एक जिवंत काडतुस आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग डॉ. संजय शिंदे, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वंसत कुवर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णु ताम्हाणे, तसेच पोलीस उप निरीक्षक भुषण कोते, पोलीस कर्मचारी कृष्णा बढे, गणेश चिचंकर, अभिजीत जाधव, महेश मंडलीक, अभिजीत रत्नपारखी, सचिन पवार कुंदन शिदे, सर्फराज देशमुख यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.