Pune Crime News : इन्कमटॅक्स ऑफिसर असल्याचे भासवून व्यवसायिकांची आर्थिक लूट करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका सराईत भामट्याला अटक केली. आरोपी हा इन्कम टॅक्स आणि फूड ऑफिसर असल्याचे भासवून व्यवसायिकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हडपसर परिसरातील एका सराफा व्यावसायिकाला त्याने इन्कम टॅक्स ऑफिसर बोलत असल्याचे सांगून फसवण्याचा प्रयत्न केला होता.

राहुल किरण सराटे (वय 27 रा. चेंबूर ईस्ट, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत त्यांनी अशा प्रकारे पाच गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिरती व्यक्तीचे हडपसर आणि औरंगाबाद येथे ज्वेलर्सचे दुकान. काही दिवसांपूर्वी त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावर फोन आला. इन्कम टॅक्स विभागातून ऑफिसर राजेंद्र कदम बोलतोय असे समोरील व्यक्तीने त्यांना सांगितले. त्यांनी फिर्यादी यांना तुमच्या विरोधात कमी प्रतीचे सोने दिल्याची एका महिलेने तक्रार केल्याचे सांगितले. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी 37 हजार दोनशे रुपये ऑनलाइन पद्धतीने भरण्यास सांगितले होते.

दरम्यान फिर्यादी व्यक्तीला त्याच्या बोलण्याचा संशय आल्याने त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला होता. प्रवीण खंडणीविरोधी पथकाचे कर्मचारी देखील या प्रकरणाचा समांतर तपास करत होते. तांत्रिक तपासादरम्यान त्यांना राहुल सराटे याच्याविषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. अधिक तपास केल्यानंतर त्याच्याकडून चेंबूर, पुणे, बेंगलोर, अंधेरी यासह इतर असे 5 गुन्हे उघडकीस आले आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.