Pune crime News : गावठी पिस्टल विक्री करणारी टोळी गजाआड, 11 पिस्तुलांसह 31 काडतुसे जप्त

एमपीसीन्यूज : गावठी पिस्तुलांची विक्री करणाऱ्या टोळीचा स्वारगेट पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यांच्याकडून 11 पिस्तुल आणि 31 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

बारक्या उर्फ प्रमोद पारसे, राजू जाधव, बल्लूसिंग पारसे, लादेन उर्फ सोहेल मोदीन आसंगी, संदीप धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी स्वारगेट पीएमपीएल बसस्टॉपवर असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, कर्मचारी ज्ञाना बडे, मानिज भोकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बारक्या उर्फ प्रमोदला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून 2  पिस्तुल आणि 4 काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने राजू जाधव याने 13 गावठी पिस्तुल बल्लूसिंग याच्याकडून आणल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी राजुला ताब्यात घेऊन 5 पिस्तुल आणी 15 काडतुसे जप्त केली. त्याशिवाय बल्लूसिंग याच्याकडून 1  पिस्तुल आणि 4 काडतुसे जप्त करण्यात आली.

त्यानंतर लादेन उर्फ सोहेल याला ताब्यात घेऊन 3 पिस्तुल आणि 8 काडतुसे जप्त करण्यात आली. सर्व आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 11 पिस्तुल आणि 31 काडतुसे जप्त करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.