Pune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून शहरात दहशत पसरवणारा सराईत शस्त्रासह जेरबंद

एमपीसीन्यूज ; पुणे शहर आणि जिल्ह्यांमधून तडीपार असतानाही शहरातील भवानी पेठ परिसरात हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अरबाज उर्फ बबन इक्बाल शेख (वय 23) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी शहरात गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार अजय थोरात यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अरबाज उर्फ बबन शेख याला अटक केली. बबन शेख याला 4 जानेवारी रोजी शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

परंतु, या आदेशाचा भंग करत तो भवानी पेठ परिसरातील चुडामन तालीम चौकात हातात कोयता घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत स्थानिक लोकांना शिवीगाळ करत दहशत निर्माण करत होता. पोलिसांनी त्यांना अटक करून खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

अरबाज शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई आणि तडीपारीची कारवाई करण्यात आली.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय गायकवाड आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.